सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री, एका चित्रपटाची फी पाहून उडतील होश, नेटवर्थ थक्क करणारी

भोजपुरी इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री. जिचे एका चित्रपटाचे मानधन ऐकून उडतील तुमचे होश. डान्समुळे देखील आहे प्रचंड लोकप्रिय.

| Updated on: Mar 29, 2026 | 7:37 AM
1 / 5
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आम्रपाली दुबे हिच्याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. आपल्या दमदार अभिनय आणि आकर्षक डान्स स्टाइलमुळे तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तिचे तडका-भडका डान्स आणि ग्लॅमरस लूक नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आम्रपाली दुबे हिच्याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. आपल्या दमदार अभिनय आणि आकर्षक डान्स स्टाइलमुळे तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तिचे तडका-भडका डान्स आणि ग्लॅमरस लूक नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.

2 / 5

आम्रपालीच्या अभिनयासोबतच तिच्या लुकवरही चाहते फिदा असल्याचे दिसून येते. आजच्या घडीला ती भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. मागील काही वर्षांत तिने आपल्या कामगिरीने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

3 / 5

जवळपास सहा वर्षांपासून ती भोजपुरी सिनेसृष्टीत सातत्याने यशस्वी कामगिरी करत आहे. आर्थिक बाबतीतही आम्रपाली दुबे चांगलीच मजबूत आहे. तिने स्वतः तिच्या संपत्तीबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नसली तरी विविध माध्यमांच्या अहवालानुसार तिची एकूण संपत्ती सुमारे 30 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

4 / 5

ती भोजपुरी इंडस्ट्रीतील हायएस्ट पेड अभिनेत्रींपैकी एक असून एका चित्रपटासाठी ती सुमारे 8 ते 10 लाख रुपये मानधन घेते. चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर आम्रपाली दुबेने निरहुआ हिंदुस्तानी या चित्रपटातून भोजपुरी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

5 / 5

या चित्रपटानंतर तिने निरहुआ हिंदुस्तानी 2, निरहुआ हिंदुस्तानी 3, पटना से पाकिस्तान, बॉर्डर, राजा बाबू, निरहुआ रिक्शावाला 2 आणि राम लखन यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही आम्रपाली चाहत्यांच्या मनात विशेष स्थान राखून आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us