
बिग बॉस 19 मध्ये दिसलेली अभिनेत्री कुनिका सदानंदने अलीकडेच तिच्या पर्सनल लाइफबद्दल मोठा खुलासा केला. काही काळापूर्वी कुनिकाने शो मध्ये तिच्या लव लाइफबद्दल डिस्कशन केलं होतं. त्यात मी आठवेळा रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने सांगितलं.

अभिनेत्री कुनिका सदानंदच्या या खुलाशाने सगळ्यांनाच हैराण करुन सोडलय. त्याशिवाय ती तिच्या घटस्फोटांबद्दल सुद्धा बोलली. तिने सांगितलं की, घटस्फोटानंतर आपल्या मुलासाठी छोट्या-छोट्या गोष्टी मॅनेज कराव्या लागल्या.

कुनिकाने सांगितलं की, तिने दोनवेळा लग्न केलं. दोन्हीवेळा हे लग्न टिकलं नाही, घटस्फोट झाला. तिने हा सुद्धा खुलासा केला की, तिचे दोन्ही पूर्वपती खूप पैसेवाले आहेत. पण दोन्हीवेळा एकही रुपये एलिमनी म्हणून घेतला नाही असं कुनिकाने सांगितलं.

कुनिका म्हणाली की, मी माझ्या आयुष्यात दोन श्रीमंतांशी लग्न केलं. पहिला नवरा सुद्धा श्रीमंत आणि दुसरा सुद्धा पैसेवाला होता. पण मी घटस्फोटासाठी एक पैसाही घेतला नाही. पहिल्या नवऱ्याला मी सांगितलं की, मला माझं मुलं पाहिजे. दुसऱ्या नवऱ्याला सुद्धा हेच सांगितलं, मी माझं मुलं माझ्याकडे ठेवते. तू तुझा पैसा तुझ्याकडे ठेवं.

या निर्णयामुळे आयुष्यात खूप स्ट्रगल करावा लागल्याचं कुनिकाने कबूल केलं. मुलाचा सांभाळ करण्यासाठी कठिण परिस्थितीतून जावं लागलं असं कुनिका म्हणाली. अनेकदा तर मुलांच्या छोट्या-छोट्या इच्छा सुद्धा पूर्ण करु शकत नव्हती असं कुनिका म्हणाली.