माझे वडिल गँगस्टर होते, मी त्यांना कुत्र्याची चैन काढून मारलेलं, प्रसिद्ध अभिनेत्याची कबुली
बिग बॉस 5 फेम वीजे आणि अभिनेत्याने व्यक्तिगत आयुष्यातील घटनांचा खुलासा केला आहे. त्याने हादरवून टाकणार्या गोष्टी सांगितल्या आहेत. बालपणीच्या या घटनांनी त्याच्या मनावर खोलवर परिणाम केला.

बिग बॉस 5 फेम वीजे आणि अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजचं खासगी आयुष्य खूप अडचणीचं होतं. लहानपणापासून घरात तो छळाचा वातावरण पाहून मोठा झालाय. सिद्धार्थने अलीकडे सिद्धार्थ कननशी बोलताना सांगितलं की, त्याचे वडिल एक गँगस्टर होते. लोकांना मारहाण करणं, त्यांना धमकावणं हे त्यांचं रोजचं काम होतं.

दिल्लीच्या कमला नगरमध्ये त्यांची एक वेगळी शान होती. पण माझ्या जन्मानंतर त्यांचं मन बदललं. ते तो भाग आणि ते जग सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले. पण वडिलांच्या डोक्यातून त्या गोष्टी गेल्या नाहीत.

मी 9 वर्षांचा असताना कोणीतरी माझ्या वडिलांना 7 व्या मजल्यावरुन ढकललं होतं. त्यावेळी आईने वडिल आणि घर दोन्ही संभाळलं. पण या लाचारीमुळे वडिल डिप्रेशनमध्ये गेले.

माझे वडिल रागाच्या भरात आईला मारायचे. सिद्धार्थ म्हणाला की, वडिले जे बूट घालायचे त्यानेच ते आईला मारायचे. जेव्हा लोक म्हणतात की, आम्ही डिप्रेशनमध्ये आहोत, तेव्हा आम्ही म्हणतो आम्ही तर मरुन गेलेलो. जो पर्यंत माणूस श्रीमंत होत नाही, फेमस नसतो, तो पर्यंत त्याला कोणी विचारत नाही. आम्ही असं बालपण घालवलं आहे.

मी 16 वर्षांचा असताना वडिलांना मारलेलं. वडिल मला सुद्धा भरपूर मारायचे. पण मी त्यांना वयाच्या 16 व्या वर्षी मारलेलं. मी कुत्र्याची चैन काढली व त्याने वडिलांना मारलं. बालपणीच्या या घटनांचा सिद्धार्थच्या मनावर खूप परिणाम झाला.