Bigg Boss Moments: बिग बॉसमध्ये स्पर्धकांनी ओलांडलेल्या सर्व मर्यादा, कोणी इंटिमेट झालं तर कोणाचा Liplock कॅमेऱ्यात कैद
Bigg Boss Moments: अभिनेता सलमान खान याचा 'बिग बॉस' शो कायम वादाच्या भोवऱ्यात असतो. शोमध्ये असे स्पर्धक आले, ज्यांनी कॅमेऱ्यासमोर सर्व मर्यादा ओलांडल्या. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांची सर्वत्र चर्चा रंगली आणि त्यांना ट्रोल देखील केलं. छोट्या पडद्यावर कोणी इंटिमेट झालं तर कोणाचा Liplock कॅमेऱ्यात कैद झाला...

'बिग बॉस 20' मध्ये जेथे एकीकडे काझी तौकीर चर्चेत आहे, तर दुसरीकडे लव्ह गिल आणि स्काउट ओपी यांच्यातील रोमान्स वादाचा विषय बनत आहे... अनेकांचं लक्ष दोघांच्या रिलेशनशिपने वेधलं आहे. रोहीत शेट्टी याने देखील लव्ह गिल आणि ओपी यांना चांगलंच सुनावलं आहे.
पण ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा नॅशनल टीव्ही समोर स्पर्धकांनी मर्यादा ओलांडल्या आहे. अनेक सेलिब्रिटींना देखील याआधी रोमान्स करताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे. ज्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.
'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये जद हदीद आणि आकांश पुरी यांनी एका टाक्स दरम्यान कॅमेऱ्यासमोर एकमेकांना लिपलॉक केलं. शोमध्ये लिपलॉक केल्यानंतर आकांशा हिला ट्रोलिंचा सामना करावा लागला...
'बिग बॉस 8' मध्ये गौतम गुलाटी आणि डायंड्रा सोरेस यांच्यातील जवळीक चर्चेत राहिली... दोघे बिग बॉसच्या घरात किस करताना दिसले. ज्यामुळे दोघांवर अनेकांनी निशाणा साधला.
'बिग बॉस'मध्ये अभिनेत्री ईशा मालवीया, एक्स बॉयफ्रेंड समर्थ जुरैल याच्यासोबत अनेकदा इंटिमेट होताना दिसली. दोघांचे अनेक रोमँटिक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघांच्या नात्यांच्या चर्चांना देखील उधाण आलेलं.
'बिग बॉस 11' मध्ये बंदगी कालरा आणि पुनीश शर्मा यांच्यातील नात्याने सर्वांचं लक्ष वेधलं. दोघे अनेकदा कॅमेऱ्यासमोर इंटिमेट होताना दिसले. दोघांना कधी लिपलॉक करताना तर कधी इंटिमेट होताना कॅमेऱ्यात कैद करण्यात. याच कारणामुळे 'बिग बॉस' शो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.