विशाल निकमने दिली प्रेमाची जाहीर कबुली, ही प्रसिद्ध अभिनेत्रीच त्याची ‘सौंदर्या’

अभिनेता विशाल निकमने बिग बॉसच्या घरात अनेकदा 'सौंदर्या'चा उल्लेख केला होता. ही सौंदर्या आहे तरी कोण, हे चाहत्यांना जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता होती. अखेर विशालने तिच्यासोबतचे रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

| Updated on: Jan 12, 2026 | 10:36 AM
1 / 5
'बिग बॉस मराठी 3'चा विजेता आणि 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत रायाची भूमिका साकारणारा अभिनेता विशाल निकम याने प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. 'माझी सौंदर्या' असं कॅप्शन देत विशालने त्याच्या प्रेयसीसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
विशालने बिग बॉसच्या घरात अनेकदा 'सौंदर्या'चा उल्लेख केला होता. पण ही सौंदर्या नेमकी आहे तरी कोण, हे कोणालाच कळलं नव्हतं. अखेर त्यावरून विशालनेच पडदा उचलला आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच विशालची सौंदर्या आहे.

3 / 5
नदीकाठी आणि पायऱ्यांवर या दोघांनी रोमँटिक फोटोशूट केलं आहे. यापैकी कुठल्याच फोटोमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. परंतु ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अक्षय हिंदळकर असल्याचं कळतंय.

4 / 5
विशालने पोस्ट केलेल्या या फोटोंवर अक्षयाने 'अभिनंदन.. खूप आनंद होतोय' अशी कमेंट केली आहे. तर अभिनेत्री माधुरी पवारने अक्षयाला टॅग करत तिचंही अभिनंदन केलं आहे. त्यामुळे विशालची गर्लफ्रेंड अक्षयाच असल्याची चर्चा सुरू झाली.

5 / 5
अक्षयाने 'साता जल्माच्या गाठी' या मालिकेत श्रुतीची भूमिका साकारली होती. याशिवाय इतरही काही मालिकांमध्ये तिने मुख्य आणि सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. 'पीएसआय अर्जुन'मध्येही ती झळकली होती.