
बिग बॉस मराठी 5 च्या मंचावर बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा पोहोचला. यावेळी घरातील सदस्यांसोबत धमाल करतानाही अक्षय कुमार हा दिसला.

यावेळी रितेश देशमुख याने अक्षय कुमार याला एक मोठे चॅलेज दिले. यामध्ये सूरज चव्हाण जे डॉयलॉग बोलेल तेच अक्षय कुमार याला बोलायचे होते.

सूरज चव्हाण आपल्या धमाकेदार अंदाजामध्ये डॉयलॉग बोलताना दिसला. मंचावर उपस्थित सर्वांनाच सूरज चव्हाण याचा हा अंदाज आवडला.

रितेश देशमुख याने अक्षय कुमारला म्हटले की, आता तुम्ही सूरजने म्हटलेले डॉयलॉग बोलून दाखवला. यावर अक्षय कुमार याने थेट म्हटले की, मी हार मानली.

डॉयलॉग बोलण्याच्या अगोदरच अक्षय कुमार याने सूरज चव्हाणसमोर हार मानली आहे. यासोबत घरातील स्पर्धकांसोबत गेम खेळतानाही अक्षय कुमार दिसला.