
'बिग बॉस मराठी 6'चा खेळ चांगलाच चर्चेत असून या आठवड्यात घरातून कोणता सदस्य बाद होणार, याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. काही दिवसांपूर्वीच घरात तीन जणांनी वाइल्ड कार्ड एण्ट्री केली होती.

या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये रेवा कौरासे, दिपाली सय्यद, सागर कारंडे, विशाल कोटियन, प्रभू शेळके, राकेश बापट आणि संस्कृती साळुंके यांचा समावेश आहे.

'भाऊचा धक्का' एपिसोडमध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुख यापैकी कोणत्या सदस्याच्या नावाची घोषणा करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र त्यापूर्वीच या सात जणांपैकी एका नावाची चर्चा आहे, जो बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे या सदस्याचं नाव ऐकून प्रेक्षकांना दु:ख नाही तर आनंदच झाला आहे. कारण अगदी पहिल्या दिवसापासून तिचा खेळ प्रेक्षकांना दिसला नाही. वाइल्ड कार्ड म्हणून तिने घरात एण्ट्री घेतली होती. अवघ्या काही दिवसांतच तिचा प्रवास संपुष्टात आला.

'बिग बॉस मराठी 6'च्या घरातून बाहेर पडणारी ही सदस्य दुसरी-तिसरी कोणी नसून संस्कृती साळुंके आहे. विशेष म्हणजे अनुश्री माने हिनं तिचं नावसुद्धा घेतलं होतं. या आठवड्यात संस्कृती बाद होणार, असा अंदाज तिने वर्तवला होता आणि तेच खरं ठरताना दिसतंय.