मराठी संस्कृतीचं भान ठेवा..; बिकिनीतील फोटोंमुळे ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री ट्रोल

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री योगिता चव्हाणने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. याच फोटोंवरून तिच्यावर टीका होत आहे. आपली मराठी संस्कृती जपा, असे फोटो टाकण्यामागचा उद्देश काय.. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

| Updated on: Mar 13, 2025 | 9:14 AM
1 / 5
'जीव माझा गुंतला' या मालिकेत अंतराची भूमिका साकारून अभिनेत्री योगिता चव्हाण घराघरात पोहोचली. त्यानंतर योगिताने 'बिग बॉस मराठी' या शोमध्येही भाग घेतला होता. आता योगिता तिच्या काही फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

2 / 5
नुकतीच योगिता इंडोनेशियातील बाली याठिकाणी फिरायला गेली होती. बालीमधल्या जिंबारन बे बीचवरील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. याच फोटोंमुळे योगिता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

3 / 5
योगिताने बालीच्या बीचवर पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. त्यावर तिने निळ्या रंगाचा शर्टदेखील घातला होता. मात्र बिकिनीतील फोटोंमुळे काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.

4 / 5
'मराठी संस्कृती आहे आपली, त्या संस्कृतीचं भान ठेवा', असं एकाने लिहिलं. तर 'असे फोटो टाकून प्रतिमा खालावते', असं दुसऱ्याने म्हटलंय. 'असे फोटो सोशल मीडियावर टाकण्यामागचा उद्देश काय? प्रसिद्धी आणि पैशांसाठी काहीही', अशीही टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

5 / 5
'मालिकेत किती संस्कारी असतेस आणि खऱ्या आयुष्यात असं..' अशा शब्दांत नेटकरी योगिताला ट्रोल करत आहेत. योगिताने अभिनेता सौरभ चौघुलेशी लग्न केलं असून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दोघं बालीला फिरायला गेले होते.