
बिग बॉस मराठीचा 6 वा सीझन सध्या जोरात सुरू असून बरीच चर्चा आहे. गेल्या 70 दिवसांपूसन घरच्यांपासून, कुटुंबियापासून घरातील सदस्य वेगळे रहात होते, बिग बॉसच्या घरात त्यांचा मुक्काम होता. म्हणूनच त्यांची भेट घेण्यासाठी सर्व सदस्यांचे घरचे खास बिग बॉसमध्ये आले, त्यामुळे वातावरण भावनिक झाल्याचं दिसून आलं. आपल्या माणसांना पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, पण डोळ्यात अश्रू होते. दिपाली सय्यद, संकेत पाठक, राकेश बापट याच्या कुटुंबियानंतर सागर कारंडेची पत्नी आणि मुलगीही बिग बॉसच्या घरात आले होते. ( All Photo - Social Media)

मात्र त्यांना पाहून सागर कारंडेने जी रिॲक्शन दिली, त्यामुळे तो चांगलाच ट्रोल झालाय. त्याचा प्रोमो समोर आला असून तो पाहिल्यावर सोशल मीडिया युजसर्नी सागरची शाळा घेत त्याला ट्रोल केलंय. सध्या सागर कारंडे चांगलाच चर्चेत आहे.

बिग बॉसच्य एका प्रोमोमध्ये बिग बॉस सागरला स्टोअर रूममध्ये जाऊन तिथे माईक बदलायला सांगता . सागर स्टोअररूममध्ये गेला, तेवढ्यात त्याला समोर पत्नी आणि मुलगी सरप्राईज देण्यासाठी थांबलेल्या दिसल्या. त्यांना तिथे अचानक पाहून सागर मोठ्याने किंचाळला. तो मोठ्याने ओरडला, त्याला रडू आवरलं नाही. त्याचे अश्रू पाहून पत्नी व मुलीलाही हुंदका फुटला.

मात्र हाच व्हिडीओ पाहून अनेकांनी सागरला ट्रोल केलं आहे. त्याचं ओरडणं, रडण पाहून नेटीजन्सनी विविध कमेंटस करत सागरची शाळा घेतली, त्याला बरंच सुनावलं. किती ओव्हर acting करायची 😂😂 प्रत्येक वेळी 😂😂 नॉर्मल एक दिवस राहिला नाही 😂😂 अशी कमेंट या प्रोमोवर एकाने केली आहे. तर सागर किती ओव्हर ॲक्टिंग करतो, कॉमेडी शो नाहीये हा, असं आणखी एकाने लिहीलं आहे.

तुमचीचं बायको आहे ती सागर कारंडे सर 🫣भूत पहिल्या सारखं का ओरडताय , एवढे नाटकं करायची काय गरज आहे असंही काही युजर्सनी कमेंट्समध्ये लिहीलं आहे.

रडला ते एक वेळ ठीक आहे पण ज्या पद्धतीने ओरडला मी पण एकदम दचकले, काय झालं म्हणून 🥺😑 राकेश बापट, प्रभू किती शांतपणे, हसत sweet gesture मधे भेटले घरच्यांना... पण संकेत आणि सागर चे जरा ओव्हर वाटलं... नॉर्मल घरातली माणसे अशीच प्रभू सारखी साधी असतात राकेश च्या घरच्यांसारखी mature असतात, अशीही कमेंट एकाने लिहीली आहे. एकंदर नेटकऱ्यांन सागरचं हे वागणं खटकलं असून अनेकांनी त्याला डायरेक्ट सुनावलं आहे.