MP Bungalow Tour : भाजप खासदाराचा भव्य बंगला की राजमहल! लग्जरी इंटेरिअर, गार्डन अन्.. फोटो पाहून विस्फारतील डोळे
MP Bungalow Tour : भाजप खासदाराच्या भव्य घराचे काही फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. घराचा प्रत्येक कोपरा प्रचंड आलिशान आणि भव्य आहे. खासदाराच्या घराचे फोटो पाहिल्यानंतर तुमचे देखील डोळे विस्फारतील... खासदाराच्या बंगल्याच्या हॉलपासून गार्डनचे फोटो समोर आले आहे.

सध्या ज्या भाजप खासदाराच्या आलिशान घराचे फोटो व्हायरल होत आहेत, ते दुसरे तिसरे कोणी नाही तर, रवी किशन आहेत. ते एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते देखील आहेत. आता त्यांच्याच घराचे काही फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर रवी किशन यांच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. रवी किशन यांचं घर सध्या चर्चेत आहे. तर तुम्हाला गोरखपूरमधील रवी किशन यांच्या घराची सफर घडवूया.
रवी किशन यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर ओळख भक्कम केली आहे. आज रवी किशन कोट्यवधी संपत्तीने मालक आहेत. गोरखपूर येथील रामगढताल येथे त्यांचा आलिशान बंगला आहे.
अभिनेत्याचं घर पाहिल्यानंतर बंगला आणि राजमहल... असा प्रश्न देखील तुम्हाला पडेल. ज्याठिकाणी रवी किशन राहतात, ते ठिकाणी सर्वात सुंदर ठिकाण आहे.. त्या ठिकाणी वातावरण देखील शांत आहे.
रवी किशन यांचा बंगला भव्य आणि प्रशस्त आहे. राखाडी आणि पांढऱ्या रंगांच्या संयोजनामुळे हा बंगला बाहेरून एखाद्या राजवाड्यासारखा दिसतो. बाहेरून पाहता, याला मोठ्या बाल्कनी आणि खिडक्या असल्याचे दिसून येते, ज्यामुळे घरात भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि ताजी हवा खेळती राहते.