नशिबाचा खेळ, 8 वर्षांपूर्वीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट अचानक OTT वर ट्रेंडमध्ये, कमाई पाहून निर्माते थक्क

बॉलिवूडचा 8 वर्षांपूर्वी वादात सापडलेला चित्रपटाने प्रदर्शित होताच मोडले अनेक रेकॉर्ड. ठरला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, कमाई पाहून निर्माते देखील झाले होते थक्क. आता ओटीटीवर करतोय ट्रेंड.

| Updated on: Mar 04, 2026 | 12:41 PM
1 / 5
लहानपणी आजी-आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी आज मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात पाहायला मिळतात. अशा ऐतिहासिक आणि पौराणिक कथांमुळे नव्या पिढीला आपल्या परंपरा आणि इतिहासाची ओळख होते. बॉलिवूडमध्ये अशा कथांवर आधारित अनेक चित्रपट निर्माण झाले आहेत.

लहानपणी आजी-आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी आज मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात पाहायला मिळतात. अशा ऐतिहासिक आणि पौराणिक कथांमुळे नव्या पिढीला आपल्या परंपरा आणि इतिहासाची ओळख होते. बॉलिवूडमध्ये अशा कथांवर आधारित अनेक चित्रपट निर्माण झाले आहेत.

2 / 5

त्यापैकीच एक गाजलेला चित्रपट म्हणजे 'पद्मावत'. 25 जानेवारी 2018 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात दीपिकाने राणी पद्मावतीची भूमिका साकारली तर रणवीर सिंगने अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत झळकला.

3 / 5

सुरुवातीला चित्रपट वादात सापडला पण त्यानंतर ‘पद्मावत’ जेव्हा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला तेव्हा तो प्रचंड हिट ठरला. सुमारे 215 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतात सुमारे 302 कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभरता 572 कोटी रुपयांची कमाई केली.

4 / 5

IMDb वर चित्रपटाला 7.1 इतके समाधानकारक रेटिंग मिळाले आहे. दीपिका पादुकोणचे सौंदर्य आणि सशक्त अभिनय, रणवीर सिंगची खलनायकी भूमिका आणि शाहिद कपूरचा पराक्रमी अंदाज प्रेक्षकांना विशेष भावला.

5 / 5

सध्या तो नेटफ्लिक्सवरही उपलब्ध असून पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. तब्बल आठ वर्षांनंतर री-रिलीज झाल्यामुळेही चित्रपट चर्चेत आला आहे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंगमध्ये स्थान मिळवत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us