अखेर प्रतिक्षा संपली! भारतात BMW बाईकची बाजारात एन्ट्री; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

भारतात BMW बाईक लाँच झाली आहे. या बाईकची किंमत 25 लाखांहून अधिक आहे. ही बाईक खडबडीत जागेवरही चालवू शकता. जाणून घ्या बाईकचे फिचर्स

| Updated on: Nov 20, 2026 | 1:19 PM
1 / 5
भारतात बीएमडब्लू बाईकची एन्ट्री झाली आहे. भारतीय बाजारात बीएमडब्लू मोटरराडने BMW R 12 G/S बाईक लाँच केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 25.40 लाख रुपये इतकी आहे.

भारतात बीएमडब्लू बाईकची एन्ट्री झाली आहे. भारतीय बाजारात बीएमडब्लू मोटरराडने BMW R 12 G/S बाईक लाँच केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 25.40 लाख रुपये इतकी आहे.

2 / 5

भारतात ही कम्प्लिटली बिल्ट युनिट म्हणून उपलब्ध असेल. तर कंपनी या बाईकचा प्रो. व्हेरिएंट विकणार आहे. या नवीन बाईकची रचना ही बीएमडब्लू आर 80 जी/एस पासून प्रेरित आहे. या बाईकमध्ये क्सासिक बॉक्सर इंजिन आहे. ही बाईक ऑफ रोडिंगसाठी तयार करण्यात आली आहे. बाईकचे चाक देखील हटके आहेत.

3 / 5

बाईकमध्ये 1,170 CC एअर/ऑइल कूल्ड बॉक्सर इंजिन आहे. त्याचबरोबर 7000 rpm वर 109 hp पॉवर, 6500 rpm वर 115 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यात येतोय. 101 mm बोर आणि 73 mm स्ट्रॉक इंजिनसहित एग्जॉस्ट सिस्टिम देण्यात आला आहे. तसेच रियर सायलेन्सर देखील आहे. बाईक ट्युबल स्टील स्पेसफ्रेमवर बनवण्यात आली आहे. या बाईकला बोल्ट-ऑन रियर फ्रेम आहे.

4 / 5

बाईकचे पुढील चाक हे 21 इंचाचे आहे. तर मागचे चाक हे 18 इंचाचे आहे. दोन्ही चाकांमध्ये क्रॉस-स्पोक डिझाइन देण्यात आली आहे. यामुळे खडबडीत जमिनीवर बाईक चांगली धावते. सस्पेन्शनसाठी पुढील बाजुला 210 मिमी ट्रॅव्हल असलेला पूर्णपणे अॅडजस्टेबल 45 मिमी अपसाईड डाऊन टेलिस्कोपिक फोर्क आहे.

5 / 5

बाईकच्या मागच्या बाजूला 200 मिमी ट्रॅव्हल पॅरालेव्हर स्विंगआर्म देण्यात आलंय. तर एंड्युरो पॅकेजमध्ये आठ अतिरिक्त अॅक्सेसरीजचा समावेश आहे. तसेच एक 20 मिमी हँडलबार रायझर यांचा समावेश आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us