
आज विदर्भवाद्याकडून महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त नागपुरातील वेगवेगळ्या कार्यालयांसमोर महाराष्ट्र शासनाऐवजी विदर्भ शासन असे पोस्टर्स चिकटविण्यात आले.

विदर्भाच्या मागणीकरिता मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळे आंदोलन सुरू आहेत. त्या आंदोलनाचा हा एक भाग असल्याचं विदर्भवाद्यांनी सांगितलं.

आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधतं वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलन केलं. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर येत वेगळ्या विदर्भाकारिता घोषणाबाजी देत विदर्भाचे स्टिकर लावले.

1 मे हा महाराष्ट्र दिन विदर्भवादी काळा दिवस म्हणून पाळत आहेत. विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र शासनचा बोर्ड असलेल्या ठिकाणी विदर्भ शासन असे स्टिकर्स लावले.

हे स्टिकर्स रात्रीच लावण्यात आले. विदर्भवाद्यांनी लावलेले स्टिकर नागपूर शहर पोलिसांनी शेवटी काढले.