
बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा नेहमीच चर्चेत असतो. नुकताच अजय देवगण याने एक मोठा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे दहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे आजही अभिनेत्याच्या मनामध्ये भीती बघायला मिळते.

अजय देवगण याने मोठा खुलासा करत सांगितले की, मी एकदा लिफ्टने जात होतो. आम्हाला वरच्या मजल्यावर जायचे होते. मात्र, अचानकच आमची लिफ्ट थेट खाली गेली.

यावेळी माझ्यासोबत इतरही काही लोक हे लिफ्टमध्ये होते. कोणाला काही जास्त मार लागला नाही. मात्र, त्यानंतर आम्हाला जवळपास एक ते दीड तास तिथे अडकून बसावे लागले.

यामुळे आजही मला एकट्याला लिफ्टमध्ये जाण्याची भीती वाटते. मी शक्यतो एकटा कधीच लिफ्टमध्ये जात नाही. कुठेतरी ती भीती अजूनही माझ्या मनामध्ये नक्कीच आहे.

अजय देवगण हा नेहमीच त्याच्या चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसतो. विशेष म्हणजे अजय देवगण हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय आहे.