
बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.

हेच नाही तर अमिताभ बच्चन यांची मुंबईमध्ये मोठी संपत्ती आहे. काही बंगले अमिताभ बच्चन यांचे मुंबईत आहेत. नुकताच आता अमिताभ बच्चन यांनी आलिबागमध्ये मालमत्ता खरेदी केलीये.

अमिताभ बच्चन यांचे दुबईमध्ये कोट्यवधी किंमतीचे घर आहे. अमिताभ बच्चन यांचे पॅरिसमध्येही घर आहे. अनेक देशांमध्ये यांची प्राॅपर्टी आहे.

मुंबईमध्ये अमिताभ बच्चन यांचा जलसा, जनक, वत्स आणि प्रतिक्षा ही बंगले आहेत. यामधील प्रतिक्षा हा बंगला अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता नंदा हिला गिफ्ट दिलाय.

अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. जाहिराती आणि अभिनयाच्या माध्यमातून मोठी संपत्ती अमिताभ बच्चन यांनी कमावली आहे.