
ऋतिक रोशन हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, सबा आझाद आणि ऋतिक रोशन हे लवकरच लग्न करणार आहेत.

आता नुकताच ऋतिक रोशन हा सबा आझाद हिच्यासाठी चक्क फोटोग्राफर बनला आहे. सबा आझाद हिने जांभळ्या रंगाच्या साडीवरील एक अत्यंत खास असा फोटो शेअर केला.

हा फोटो शेअर करत सबा आझाद हिने स्पष्ट केले की, ऋतिक रोशन याने हा फोटो काढला आहे. म्हणजेच काय तर सबासाठी थेट फोटोग्राफर ऋतिक रोशन बनला.

सबा आझाद या फोटोमध्ये अत्यंत जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहे. अनेकांना सबा आझाद हिचा हा फोटो आवडल्याचे बघायला मिळतंय

ऋतिक रोशन आणि सबा आझाद कायमच एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. नेहमीच एकमेकांचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.