
बाॅलिवूड स्टार सैफ अली खान हा नेहमीच चर्चेत असतो. सैफ अली खान याचा आदिपुरुष हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत आहे.

रिअल लाईफमुळे अत्यंत राॅयल लाईफ सैफ अली खान हा जगतो. मुंबईतील बांद्रा परिसरात सैफ अली खान याचे आलिशान घर असून जिमपासून सर्व सुविधा या घरात आहे. या घराची किंमत कोट्यावधी आसपास आहे.

सैफ अली खान याने आपल्यापेक्षा वयाने तब्बल दहा वर्षांनी लहान असलेल्या करीना कपूर हिच्यासोबत दुसरे लग्न केले आहे. सैफ अली खान हा तब्बल 1180 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

हरियाणाच्या पटोदी गावामध्ये सैफ अली खान याचे आलिशान पटोदी पॅलेस आहे. या पॅलेसमध्ये तब्बल 150 रूम आहेत. एखाद्या राजमहालसारखे हे पॅलेस असल्याचे सांगितले जाते. 800 कोटी या पॅलेसची किंमत असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

सैफ अली खान याच्याकडे अत्यंत महागड्या गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. एका चित्रपटासाठी सैफ अली खान हा तब्बल 15-16 कोटी फिस देखील घेतो. जाहिरातीमधूनही तगडी कमाई सैफ अली खान हा करतो.