
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात रणबीर कपूर याचे नाव आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. या प्रकरणात रणबीर कपूर याला थेट ईडीने समन्स पाठवलाय.

ईडीच्या कार्यालयात रणबीर कपूर याला 6 आॅक्टोबर रोजी चाैकशीसाठी उपस्थित राहिचे होते. मात्र, रणबीर कपूर याने ईडीला दोन आठवड्यांचा वेळ मागितलाय.

आता नुकताच रणबीर कपूर हा स्पाॅट झालाय. रणबीर कपूर यावेळी अत्यंत वेगळ्या लूकमध्ये दिसलाय. यावेळी रणबीर कपूर हा एका जाहिरातीच्या शूटसाठी पोहचला.

रणबीर कपूर याचा हा लूक काही लोकांना आवडल्याचे दिसतंय. रणबीर कपूर याचे हे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

रणबीर कपूर हाच नाही तर इतरही बरेच कलाकार ईडीच्या निशाण्यावर आहेत. अनेकांना ईडीने नोटीस देखील पाठवल्या आहेत. यामुळे चाहते हैराण झालेत.