
बॉलिवूड कलाकार अनुपम खेर इंडस्ट्रीमधल्या सीनियर कलाकारांपैकी एक आहे. इंडस्ट्रीमध्ये अनुपम खेर हे शानदार अभिनय आणि उत्तम व्यक्तीमत्वासाठी ओळखले जातात.

अनुपम खेर यांच्याच पावलावल पाऊल टाकत सिकंदर खेरने बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या बळावर आपली जागा बनवली आहे. सिकंदर खेर अभिनेत्री सुष्मिता सेनची गाजलेली वेब सीरीज आर्यामध्ये एक महत्वाच्या रोलमध्ये दिसलेला.

फक्त आर्याच नाही, तर सिकंदरने मोनिका ओ माय डार्लिंग आणि मंकी मॅन सारखी क्लासिक फिल्म आणि सीरीजमध्ये कमालीचा अभियन केलेला. सिकंदर ओटीटी प्लॅटफॉर्मवरच एक मोठं नाव आहे.

आज सिकंदर याचा बर्थ डे आहे. 31 ऑक्टोंबर 1982 रोजी सिकंदरचा जन्म झाला. सिकंदर हा किरण खेर आणि त्यांचा पहिला नवरा गौतम बेरी यांचा मुलगा आहे. सिकंदर किरण खेर यांचे दुसरे पती आणि अनुपम खेर यांचा सावत्र मुलगा आहे. वडिल गौतम गेल्यानंतर अनुपम यांनी सिकंदरच पालन पोषण केलं, त्याची काळजी घेतली.

सिकंदरचा अनुपमसोबत एक खास प्रेमाचा बॉन्ड आहे. दोघांच्या मनात परस्पराबद्दल प्रेम, आदराची भावना आहे. इवेंट्समध्ये दोघे अनेकदा एकत्र दिसतात. अनुपम यांच्याविषयी मुलगा सिकंदर अनेकदा पोस्टही करत असतो.