
28 वर्षीय अभिनेत्री आरूषी शर्मा हिने नुकताच गुपचूप पद्धतीने लग्न केले. आता आरूषीच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिनेत्री आरूषी शर्मा हिने कास्टिंग डायरेक्टर वैभव विशांतसोबत लग्न केले. आता यांच्या लग्नाचे फोटो पुढे आले. यांच्या या लग्नाबद्दल कोणालाही कल्पना नव्हती.

फोटोंमध्ये आरूषी शर्मा आणि वैभव विशांत यांची जोडी जबरदस्त दिसत आहे. या लग्नाला अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.

पिंक रंगाच्या कपड्यांमध्ये अभिनेत्री आरूषी शर्मा ही दिसत आहे. विशेष म्हणजे चाहत्यांना आरूषी शर्मा हिचा हा लूक जबरदस्त आवडल्याचे देखील बघायला मिळत आहे.

आरूषी शर्मा ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. आरूषी शर्मा हिची सोशल मीडियावर एक जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग नक्कीच बघायला मिळते.