
बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. त्याचे कारणही तेवढेच खास आहे. आलिया भट्ट ही निर्देशक नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटामुळे ट्रेंड होत आहे.

एक चर्चा आहे की, आलिया भट्ट ही रामायणमध्ये माता सितेच्या भूमिकेत असणार आहे. जेंव्हापासून ही चर्चा सुरू झाली तेंव्हापासून आलिया भट्ट ही ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

रामायणमध्ये आलिया भट्ट ही माता सीता बनणार असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. आलियाला अनेकजण शुभेच्छा देताना देखील दिसत आहेत.

दुसरीकडे काही लोकांनी आलिया भट्ट ही माता सितेच्या भूमिकेत दिसणार असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. एकाने लिहिले की, या लोकांना आलिया भट्ट हिच्या शिवाय दुसरे कोणीच दिसत नाही का?

अजून एकाने लिहिले की, मला तर वाटते की, आता बाॅलिवूडमध्ये अभिनेत्रीच राहिल्या नाहीत. प्रत्येक चित्रपटामध्ये ही आलिया भट्टच का? अजून एकाने लिहिले की, हे फक्त नेपोटिझमच आहे.