
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणकर सध्या तिच्या अभिनयानं सर्वांचे मन जिंकत आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. भूमीचा हॉट अवतारही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. सोशल मीडियावर ती प्रचंड अॅक्टिव्ह असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

भूमी तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते आणि तिचं वर्कआउट सेशन्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

भूमीला इन्स्टाग्रामवर 6.2 दशलक्ष लोक फॉलो करतात. ती फोटो पोस्ट करताच तिचे प्रत्येक फोटो व्हायरल होतात.

सध्या भूमीजवळ चित्रपटांची लांब लाइन आहे. अक्षय कुमारसोबत लवकरच ती ‘रक्षाबंधन’ चित्रपटात दिसणार आहे.

रक्षाबंधन व्यतिरिक्त भूमी राजकुमार रावसोबत ‘बधाई दो’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. आता चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

या चित्रपटांमध्ये भूमीचं पात्र बऱ्यापैकी वेगळे असणार आहे. तिच्या आगामी चित्रपटांसाठी ती तिच्या फिटनेसवर विशेष काम करत आहे.