
सिद्धार्थ कननला दिलेल्या जुन्या मुलाखतीत कुनिका म्हणालेली की, मला दोन चित्रपटातून यासाठी काढलं, कारण मी कॉम्र्पोमाइज करायला नकार दिलेला. कुनिकाने सांगितलं की, एक मोठा चित्रपट होता. एका मोठा डायरेक्टर हा सिनेमा बनवत होता. अभिनेतेही सिनिअर होते. त्यांना मी माझ्या वडिलांसमान मानत होती.

पण त्यांनी मला कॉम्र्पोमाइज करायला सांगितलं. मी नकार दिल्यानंतर मला काढून टाकलं. अभिनेत्री म्हणाली की, चित्रपटासाठी माझे कपडे बनले. दुसऱ्यादिवशी माझी फ्लाइट होती. माझा खलानायिकेचा रोल होता. रोल मोठा होता.

प्रोड्यूसर मला म्हणाले की, "तू कॉम्र्पोमाइज करणार नाहीस, मी दोन भुकेल्या सिंहांना शूटिंगला घेऊन चाललीय. 40 दिवसात त्यांच्यासमोर मला काहीतरी टाकावच लागेल. त्यावेळी मी खूप रडलेली"

जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीत आलेली. त्यावेळी अशा गोष्टींकडे वाईट गोष्ट म्हणून पाहिलेलं. लोकांच म्हणणं होतं की, चांगल्या घरातल्या मुली फिल्म इंडस्ट्रीत जात नाहीत असं कुनिका म्हणाली.

एका मोठ्या कॅमरामनचा असिस्टेंट हाताला परफ्यूम लावून हिरॉईनच्या जवळ जायचा. पण हळूच कानात सांगायचा की, संध्याकाळी या हॉटेलमध्ये आहे, तिथे ये असं कुनिका सदानंद म्हणाली.