Esha Deol : घटस्फोटानंतर ईशा देओलची नव्या आयुष्याची सुरुवात, चाहत्यांना ‘गुडन्यूज’
Esha Deol : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ईशा देओल तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलेली. घटस्फोटानंतर सर्वत्र ईशा हिचीच चर्चा सुरु होती. अखेर घटस्फोटानंतर अभिनेत्रीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिची चर्चा सुरु आहे.

अभिनेत्री ईशा देओल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, काही हीट सिनेमे बॉलिवूडला दिल्यानंतर ईशाने अभिनय विश्वाचा निरोप घेतला. त्यानंतर अभिनेत्रीने तिचा संपूर्ण वेळ पती आणि मुलांना दिला. पण आता अभिनेत्रीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

घटस्फोटानंतर ईशा पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'मालामाल वीकली 2' सिनेमासाठी निर्मात्यांनी ईशा हिला अप्रोच केलं होतं. आता सिनेमात अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे... आता चाहते ईशा हिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सांगायचं झालं तर, ईशा गेल्या काही दिवसांपासून चांगल्या कथेच्या प्रतिक्षेत होती. अखेर अभिनेत्रीची प्रतिक्षा संपली आहे. सिनेमाच्या शुटिंगची सुरुवात नोव्हेंबर 2026 मध्ये सुरु होऊ शकते. अशी देखील माहिती समोर येत असून, ही ईशाच्या चाहत्यांसाठी मोठी गुडन्यूज आहे.

अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, ईशा हिने 2012 मध्ये लहानपणीची मित्र भपत तख्तानी याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने दोन मुलींना जन्म देखील दिला. पण 2024 मध्ये भरत आणि ईशा याचा घटस्फोट झाला.

ईशाने 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोई मेरे दिल से पूछे’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही हीट सिनेमे बॉलिवूडला दिल्यानंतर ईशाने अभिनय विश्वाचा निरोप घेतला. घटस्फोटानंतर आता अभिनेत्री नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे.