Bollywood Actress : इमरान हाशमी सोबत तिचा तो सीन गाजला, 711 विकेट घेणाऱ्या बॉलर सोबत लग्न, आता काय करते ती अभिनेत्री?

Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी एकारात्रीत यश, प्रसिद्धी मिळवली, नंतर त्या गायब झाल्या. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा होते.

| Updated on: Mar 13, 2026 | 2:16 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी सोबत अनेक अभिनेत्रींनी काम केलय. ज्या अभिनेत्री त्या काळात एका रात्रीत फेमस झाल्या आणि नंतर अचानक गायब झाल्या. इमरान हाशमी उत्तम अभिनेता आहे. पण एकेकाळी तो अभिनयापेक्षा सीरियल Kisser म्हणून लोकप्रिय होता.

बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी सोबत अनेक अभिनेत्रींनी काम केलय. ज्या अभिनेत्री त्या काळात एका रात्रीत फेमस झाल्या आणि नंतर अचानक गायब झाल्या. इमरान हाशमी उत्तम अभिनेता आहे. पण एकेकाळी तो अभिनयापेक्षा सीरियल Kisser म्हणून लोकप्रिय होता.

2 / 5

आज आम्ही तुम्हाला इमरान हाशमी सोबत काम केलेल्या अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिच्या सौंदर्याची अजूनही सोशल मीडियावर चर्चा होते. आम्ही बोलताय अभिनेत्री गीता बासराबद्दल. गीताने वर्ष 2006 मध्ये इमरान हाशमी सोबत 'दिल दिया है'चित्रपटात काम केलेलं.

3 / 5

गीता बासरा रातोरात चर्चेत आली. गीताचा जन्म 13 मार्च 1984 रोजी पोर्ट्समाउथ येथे इंग्लंडच्या एका पंजाबी कुटुंबात झाला. भारतात येण्याआधी तिला क्रिमिनल सायकोलॉजिस्ट बनायचं होतं. पण नशिबाला अजून काहीतरी अपेक्षित होतं. तिने चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं आणि नशीब पालटलं.

4 / 5

गीता आज फिल्मी दुनियेपासून लांब आहे. पण तिने एकेकाळी 'द ट्रेन' (2007), 'जिला गाजियाबाद' (2013) आणि 'मिस्टर जो बी. कार्वाल्हो' (2014) सारख्या चित्रपटात काम केलय. सौंदर्यासोबत इमरान हाशमीसोबतचा तिसा Kissing सीन गाजला होता.

5 / 5

गीताने प्रसिद्ध क्रिकेटपटू हरभजन सिंह सोबत लग्न केलं. भज्जीने गीताला 'द ट्रेन' मधील प्रसिद्ध गाणं वो अजनबी मध्ये पाहिलं आणि पहिल्या नजरेत तिच्या प्रेमात पडला. हरभजनने गीताचा नंबर शोधून काढला व युवराज सिंह करवी तिला मेसेज केला. आधी गीताने त्याचा मेसेज इग्नोर केला. पण नंतर ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us