
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. ऐश्वर्याने अभिषेकचे घर सोडल्याचेही सांगितले जातंय.

ऐश्वर्या राय नव्हे तर करिश्मा कपूर ही जया बच्चन यांची पहिली पसंत होती. मात्र, काही कारणामुळे अभिषेक आणि करिश्माचे लग्न होऊ शकले नाही.

वाढदिवसाच्या एका कार्यक्रमात जया बच्चन यांनी थेट करिश्मा कपूर आपल्या खानदानाची सून असल्याचे देखील थेट म्हटले होते.

हेच नाही तर संपूर्ण बच्चन कुटुंबिय करिश्मा कपूरला सून म्हणून पसंत करत होते. असे सांगितले जाते की, ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांचे नाते चांगले नाहीये.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा खरोखरच घटस्फोट होणार का? असा प्रश्न चाहत्यांकडून सतत उपस्थित केला जात आहे. मात्र, यावर ऐश्वर्या किंवा अभिषेक भाष्य करताना दिसत नाहीत.