
अभिनेत्री जूही चावला हिने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केलं. आज देखील अभिनेत्रीचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहातात. पण गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. आता जुही तिच्या खास लूकमुळे चर्चेत आली आहे.

वयाच्या 56 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढत आहे. सोशल मीडियावर सध्या जुहीच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. साठीच्या उंबरठ्यात असूनही जुहीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

जुही कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याच प्रयत्न करत असते. एवढंच नाहीतर, जूही कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आजही चाहत्यांमध्ये जुहीची क्रेझ कायम आहे.

जुही तिच्या संपत्तीमुळे देखील कायम चर्चेत असते. जुही आता फिल्मी दुनियेपासून खूपच लांब गेली आहे. पण असं असलं तरी तिने एका गोष्टीत सर्व अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. जुही चावला भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री बनली आहे.

जुही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जुही कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.