
अभिनेत्री काजोल हिने काळ्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे. मंकरसंक्रांतीच्या दिवशी तुम्ही देखील अभिनेत्रीचा लूक फॉलो करु शकता.

मंकरसंक्रांतीच्या दिवशी महिला काळ्या रंगाच्या साड्या नेसतात. ही एक परंपराच आहे. संक्रांतीच्या दिवशी कळे कपडे घालण्याची प्रथा आहे. त्यामुळे काजोलचा लूक यंदाच्या वर्षासाठी परफेक्ट ठरेल...

सांगायचं झालं तर, काजोल कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील काळ्या साडीमध्ये फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'काळा नेहमीच नवीन काळा ठरतो...' असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

सांगायचं झालं तर, 90 च्या दशकात काजोल हिने फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. काजोलचे काही सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडीने पाहतात. आज अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.