
बिग बॉस 19 वा सीजन गाजवण्यासाठी घरात कुनिका सदानंदची एन्ट्री झाली आहे. होस्ट सलमान खानच तिच्यासोबतच इंटरॅक्शन खूपच मजेदार होतं. कुनिका सदानंदने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात अभिनय केलाय. हॉट, बोल्ड बिनधास्त अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. रोखठोक बोलण्यासाठी कुनिका सदानंद ओळखली जाते.

सलमानने प्रीमियरच्या रात्रीच कुनिका सदानंदच्या अफेअरची पोलखोल केली. दोघांमधील ट्यूनिंग पाहून असं वाटलं की, दोघे चांगले वाइब्स शेअर करतात. कुनिका घरात वादळ आणेल असा सलमान खानचा दावा आहे. घरात ती स्वत:च्या आणि इतरांच्या हक्कासाठी फाईट करेल.

कुनिका बद्दल सलमानने स्टेजवर एक महत्वाचा खुलाला केला. तो म्हणाले की, आमच्या क्रिएटिव टीमला समजलय की, लहान वयाची मुलं तुम्हाला डायरेक्ट मेसेजेस करतात. 24-25 वर्षांची मुलं तुम्हाला प्रपोज करतात. सलमानच बोलणं ऐकून कुनिका आधी लाजली. मग, तिने कबूल केलं की, तरुण मुल तिला प्रपोज करतात.

कुनिका सदानंदने सांगितलं की, असे प्रपोज ती धुडकावून लावते. कुनिकाने सांगितलं की, तिचा स्वत:चा मुलगा 24 वर्षांचा आहे. तिला हे सर्व खूप क्यूट वाटतं. सलमानने कुनिकाला सांगितलं की, त्याने तिचा असा एक चाहता शोधून काढलाय. ज्याने 500 पेक्षा जास्त वेळ तिला मेसेज केला होता.

कुनिका सदानंद तिच्या पर्सनल लाइफमुळे खूप चर्चेत असते. तिने प्रसिद्ध गायक कुमार सानूसोबत अफेयरची कबुली दिली होती. त्यावेळी कुमार सानू विवाहित होते. कुनिकाच दोनवेळा लग्न मोडलय. दोन लग्नांपासून तिला दोन मुलगे आहेत. वयाच्या 61 व्या वर्षी सुद्धा ती इंटरनेट सेंसेशन आहे. फॅन्सची ती फेवरेट आहे.