मलायका अरोरा हिच्या कुटुंबाबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे, बहीण आणि आई वडील अनेक वर्षांपासून…

Malaika Arora : मलायका अरोरा हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. मलायका अरोरा हिच्या वडिलांनी राहत्या इमारतीवरून उडी घेत थेट आत्महत्या केलीये. त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक कलाकार हे थेट मलायका अरोरा हिच्या घरी पोहोचले. विशेष म्हणजे अरबाज खान वडिलांसोबत मलायकाच्या घरी गेला.

| Updated on: Sep 12, 2024 | 12:29 PM
1 / 6
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मलायकाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आज सकाळीच मलायका अरोराच्या वडिलांनी सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केलीये.

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मलायकाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आज सकाळीच मलायका अरोराच्या वडिलांनी सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केलीये.

2 / 6

मलायका अरोरा 11 वर्षांची असतानाच तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. मलायका आपल्या आई आणि बहिणीसोबत चेंबूरला राहत. मलायकाची आई मल्याळी ख्रिश्चन आहे आणि तिचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू होते. भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये त्यांनी नोकरी केली.

3 / 6

मलायका अरोराने चेंबूरच्या स्वामी विवेकानंद शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ती ठाणे होली क्रॉस हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. महाविद्यालयीन शिक्षण चर्चगेट येथे झाले. त्यानंतर मलायकाने मॉडेलिंग सुरू केले. घटस्फोटाच्या अनेक वर्षांनंतर तिचे आई वडील परत एकदा एकत्र राहत होते.

4 / 6

मलायका मॉडेलिंगच्या दुनियेत आली, अनेक जाहिरातींमध्ये दिसली आणि त्यानंतर आयटम साँग केले. मलायका 2005 मध्ये नच बलिये या टेलिव्हिजन शोमध्ये जज झाली. 2010 मध्ये ती झलक दिखला जा या शोमध्ये जज होती.

5 / 6

मलायका अरोराचे खासगी आयुष्य चर्चेत राहिले आहे. मलायका अरोरा हिने अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर ती अर्जुन कपूरला डेट करत होती. आता अर्जुनच्या आणि तिच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. मलायका मुलगा देखील लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे.

6 / 6

मलायका अरोराच्या बहिणीचे नाव अमृता अरोरा आहे. 'कितने दूर कितने पास' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. त्यानंतर मलायकाच्या बहिणीने शकील लडाकशी याच्यासोबत लग्न केले. तिला दोन मुले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us