अचानक हवामान बदलणार, भूस्स्खलन होणार, पुढील 72 तास… शास्त्रज्ञही हादरले, नेमकं काय घडतंय?
सध्या एक मोठं संकट घोंघावतंय, होय हवामान शास्त्रज्ञांनाही या संकटाचा धसका घेतला आहे. 'ओलाना' हे वादळ मोठं अडचणीचं ठरु शकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येणाऱ्या 72 तासांमध्ये मोठं संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे एक भयानक वादळ असणार आहे, या संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील शास्त्रज्ञांची अक्षरशः झोप उडाली आहे. पुढील काही तासांमध्ये मानवी जीनव आणि निसर्ग यांच्यामध्ये एक मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो, या भयानक संघर्षाची कल्पना कोणीच केली नसेल, असं हे वादळ असू शकतं, आकाशातून पडणारे पाण्याचे थेंब हे केवळ पावसाचे थेंब नसतील तर ते एका मोठ्या संकटाचा इशारा असणार आहेत, जे सर्व मानवी जीवनालाच नेस्तनाबूत करण्याची ताकद ठेवतात, असा भयानक अंदाज हवामान शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
नेमकं काय घडतंय?
हवामानातील अचानक होणाऱ्या बदलांनी शास्त्रज्ञांना हादरवून टाकले आहे. समुद्रात तयार होत असेलेल हे चक्री वादळ हे आता धोकादायक आणि भयावह टप्प्यात पोहचल्याचा दावा हवामानशास्त्रज्ञांनी केला आहे. हे वादळ हवाईच्या (मध्य पॅसिफिक महासागराजवळील एक बेट) जमिनीवर थेट पोहोचणार नाही, समुद्रातूनच मोठं वळण घेऊन ते पुढे निघून जाणार आहे. पण एका गोष्टीने चिंता वाढवली आहे, ती म्हणजे हे वादळ पूर्वकडे कुच करत आहे. त्यामुळे आता संपूर्ण द्वीपसमुहाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झालीये.
द्वीपसमुहामध्ये या वादळामुळे मुसळधार पाऊस, भीषण पूर आणि मोठं भूस्खलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांचे आणि पर्यटकांचे मोठे नुकसान होऊ शकते. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या सागरी वादळावर गेल्या आठवड्यापासून हवामानशास्रज्ञ बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. यावेळी त्यांना लक्षात आलं की, या वादळानं स्वतःचा विस्तार केला आहे. रविवारी या वादळाचे ओलाना उष्णकटिबंधीय वादळामध्ये रुपांतर झाले होते. त्यानंतर हळू हळू त्याचे वारे थोडे मंदावले आणि त्याची तीव्रता कमी झाली. पण वाऱ्याचा जोर कमी झाला असला तरी वादळ थेट किनाऱ्यावर धडकणार नसले तरीही धोका पूर्णपणे संपला असे म्हणता येणार नाही. Accu Weatherने आपल्या रिअलइम्पॅक्ट स्केलवर या वादळाच्या धोक्याला पहिल्या श्रेणीमध्ये टाकले आहे. याचा अर्थ असा की या वादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता असून त्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानीचीही शक्यता नाकारता येत नाही.
