
फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेहमीच नेपोटिज्मवरुन चर्चा होते. आउटसाइडर्सच असं म्हणणं आहे की, नेपो किड्सना जास्त संधी मिळते. टॅलेंटपेक्षा नात्याला महत्व दिलं जातं.

पण इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध विलन मोहनिश बहलची मुलगी प्रनुतन बहल सोबत असं झालं नाही. तिने स्वत: ही गोष्ट कबूल केली. इंडस्ट्रीमधील असून सुद्धा तिला बऱ्याच संघर्षाचा सामना करावा लागला. अभिनेत्रीने आपली स्ट्रगल स्टोरी शेअर केलीय.

प्रनुतन बहल आपल्या संघर्षाबद्दल बोलताना म्हणाली की, मी अभिनेते-अभिनेत्रींमध्ये राहिली आहे. म्हणून मला माहितीय की इंडस्ट्री खूप टफ आहे. असे अनेक प्रसंग येतील, जेव्हा तुमच्याकडे काम नसेल. ज्यांनी फिल्मी पार्श्वभूमी नाही, त्यांना इंडस्ट्रीमध्ये जास्त अडचणींचा सामना करावा लागतो.

प्रनुतनची आजी नूतन बॉलिवूडमधील आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्यांनी अनेक हिट मोठ्या चित्रपटात काम केलं. पुरस्कारही मिळवले. दुसरीकडे तिचे वडील मोहनीश बहल फार पूर्वीपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्यांच्या खलनायकी व्यक्तीरेखा भरपूर गाजल्या.

अभिनेत्रीच्या चित्रपटांबद्दल सांगायच झाल्यास झहीर इकबालच्या अपोजिट तिने 2019 साली करिअरची सुरुवात केली. त्यानंतर हेलमेट आणि अमर प्रेमाची अमर कहाणी चित्रपटांचा भाग राहिली. आता ती कोको अँड नट चित्रपटात दिसणार आहे.