अभिनेत्रीच्या बिकिनीचा झाला होता लिलाव, खरेदीदाराने असे काही केले की सर्वजण झाले हैराण
बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे लाखो दिवाने आहेत. एक काळ तर असा होता जेव्हा चाहते अभिनेत्रींना पत्र लिहायचे. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत.

बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या बोल्ड अंदाजासाठी विशेष ओळल्या जातात. या अभिनेत्रींची फॅनफॉलोइंग तर सातासमुद्रापार असायची. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा एका अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत जिच्या बिकिनीचा लिलाव झाला होता. तिची बिकिनी खरेदी करणाऱ्याने असे काही केले होते की सर्वजण हैराण झाले होते. आता ही अभिनेत्री कोण होती? वाचा...
आम्ही अभिनेत्री पूजा बेदीबद्दल बोलत आहोत. खरे तर १९९३ मध्ये पूजा ‘लुटेरे’ या चित्रपटात दिसली होती. त्या वेळी पूजाने बिकिनी घातली होती. त्याच बिकिनीचा लिलाव झाला होता. पूजाने स्वतः याबाबत सांगितले होते.
पूजाने कपिल शर्मा शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. मे १९९३ मध्ये मुंबईतील क्रॉसवर्ड येथे ‘फॉरएव्हर यॉर्स’ या नावाने एक खास लिलाव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्टार्सनी घातलेले कपडे आणि इतर वस्तूंची लिलाव झाला होता.
या इव्हेंटचे होस्टिंग अर्चना पूरन सिंह यांनी केले होते. या लिलावात पूजा बेदीच्या बिकिनीसाठी एका व्यक्तीने १५०० रुपयांची बोली लावली आणि ती खरेदी केली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीची दीवानगी इथे संपली नाही.
पूजाने सांगितले होते की, तो माणूस तिला बराच काळ त्रास देत होता. त्याने आपले नाव तिच्या आवडत्या परफ्यूम ‘अनाइस-अनाइस’च्या नावावर ठेवले होते. इतकेच नाही, तर तो तिला अनेकदा फोन करत असे आणि रक्ताने लिहिलेली पत्रेही पाठवत असे.
पण एके दिवशी त्या व्यक्तीने मर्यादा ओलांडली. तो माणूस पूजा बेदीच्या लिलावात खरेदी केलेली बिकिनी घेऊन तिच्या घरी पोहोचला. पूजाने त्याला बसवून समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या वागण्यामुळे ती त्रासलेली होती. पूजाने सांगितले होते की, हे सर्व तिचे लग्नहोईपर्यंत सुरू राहिले.