
अभिनेत्री काजोल गेल्या काही दिवसांपासून तिच्या नव्या शोमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या शोमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. तर काजोल देखील तिच्या मतांमुळे चर्चेत असते.

आता देखील काजोल हिने सोशल मीडियावर ग्लॅमरस लूकमध्या काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनच्या माध्यमातून चाहत्यांना मोठा सल्ला दिला आहे. अभिनेत्री म्हणते, ज्या गोष्टींची मी काळजी करते त्यापैकी 90 टक्के गोष्टी कधीच घडत नाहीत! अधिक आरोग्य टिप्ससाठी मला फॉलो करा....

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.