
अभिनेत्री प्राची देसाई कायमच चर्चेत असते. मुलाखतीमध्ये प्राची देसाईने सांगितले की, ती लवकरच लग्न करणार आहे आणि चांगला व्यक्ती मिळाला की, ती लग्न करेल.

प्राची देसाईने सांगितले की, ती खूप भावनिक आहे. प्रेमासाठी ती काहीही करू शकते, यापूर्वी तिला प्रेमात धोका मिळालाय.

रोहित शेट्टीसोबत प्राचीचे अफेअर होते असे सांगितले जाते. रोहित आणि प्राचीच्या अफेअरमुळे रोहितच्या पर्सनल आयुष्यात मोठे वादळ आले होते.

कधीच रोहित आणि प्राची यांनी त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाही. आता प्राची देसाई लग्न करणार असल्याने जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

प्राची देसाई तिच्या आगामी चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन करत आहे. प्राची देसाई सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. जबरदस्त फॅन फाॅलोइंग प्राचीची आहे.