
अभिनेत्री प्रीती झिंटाने अनेक हिट चित्रपट दिली आहेत. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून प्रीती झिंटाही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. नुकताच प्रीती झिंटाकडून मोठा खुलासा करण्यात आलाय.

प्रीती झिंटा म्हणाली, मला चित्रपट करायचे होते, बिझनेसवर लक्ष द्यायचे होते आणि पर्सनल लाईफवरही लक्ष द्यायचे होते. मी माझ्या करिअरमध्ये कोणत्याच अभिनेत्याला डेट केले नाही.

हेच नाही तर कोणत्याच अभिनेत्यासोबत माझे नाव जोडले गेले नाही. स्वत:चे कुटुंब असणे माझ्यासाठी आवश्यक होते. स्वत: चे एक चांगले आयुष्य जगणे आवश्यक होते.

सक्सेस फुल अभिनेत्री व्हावे आणि आयुष्य एकटे जगावे, हे मला कधीच हवे नव्हते. पुढे प्रीती झिंटा म्हणाली की, सहा वर्षांमध्ये बऱ्याच चित्रपटाच्या स्क्रीप्ट वाचल्या.

आता फायनली पुनरागमन करण्याचे ठरवले. प्रीती झिंटा हिचा चाहतावर्ग मोठा आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.