
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत असते. प्रियांका चोप्रा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. प्रियांका चोप्रा ही सध्या विदेशात राहते.

लॉस एंजिल्समध्ये प्रियांका चोप्रा ही तिच्या पती आणि मुलीसोबत राहते. विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा हिचे हे घर अत्यंत आलिशान आहे.

प्रियांका चोप्रा हिच्या या घराची कोट्यावधी रूपये किंमत आहे. इतकेच नाही तर या घरामध्ये सात बेडरूम देखील आहेत. खास डिझाईन हे घर करण्यात आलंय.

अनेक सुविधा देखील या घरात आहेत. स्विमिंग पूल, जिम देखील आहे. विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा हिच्या या विदेशातील घरात पूजेची मंदिर देखील आहे.

प्रियांका चोप्रा हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. मात्र, निक जोनस याच्यासोबत लग्न झाल्यापासून ती विदेशात आहे.