वेदनादायी प्रवास, सात वर्षांचा कालावधी आणि त्यानंतर थेट गर्भपात, अभिनेत्रीने..
बाॅलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ही कायमच चर्चेत असते. राणी मुखर्जी हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. राणी मुखर्जी हिचे चित्रपट धमाल करताना दिसले. राणी मुखर्जी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. राणी मुखर्जी ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.

नुकताच अभिनेत्री राणी मुखर्जी हिने मोठा खुलासा केलाय. आपल्या वेदना सांगताना यावेळी राणी मुखर्जी ही दिसली आहे. सात वर्षांनी गर्भधारणा आणि त्यानंतर घडलेल्या गोष्टींबद्दल बोलताना राणी मुखर्जी दिसली.
राणी मुखर्जी म्हणाली की, मी लग्नाच्या एक वर्षांमध्ये प्रेग्नंट झाले आणि मी मुलीला जन्म दिला. यानंतर मी दुसऱ्या गर्भधारणेसाठी खूप प्रयत्न केले.
मात्र, सात वर्षे मला दुसऱ्यांदा प्रेग्नंट होण्यासाठी लागले. हेच नाही तर सात वर्षांनी प्रेग्नंट झाले आणि माझा गर्भपात झाला. आपल्या वेदनांबद्दल बोलताना राणी मुखर्जी दिसली.
राणी मुखर्जी म्हणाली की, मला या गोष्टींचे दु:ख आहे की, मी माझ्या मुलीला एक बहीण किंवा भाऊ देऊ शकले नाही. आता ते वय देखील राहिले नाहीये.
राणी मुखर्जी हिच्या मुलीचे नाव आदिरा आहे. आदिरा आठ वर्षांची आहे. आता राणी मुखर्जीच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहेत.