
रवीना टंडन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. रवीना टंडनची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. रवीना टंडन हिचा वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षीच अक्षय कुमार याच्यासोबत साखरपुडा झाला होता.

याबद्दल रवीना टंडन हिच्याकडून हैराण करणारा खुलासा करण्यात आला. रवीना टंडन म्हणाली की, मी अक्षयला सांगितले होते की, मी तशी मुलगी नाही जिला तू मजेसाठी फिरवशील आणि सोडून देशील.

त्यानंतर अक्षयने मला सांगितले होते की, मी माझ्या पालकांना तुझ्या घरी पाठवेल आणि त्याने पाठवले आणि आमचे लग्न अॅरेज मॅरेजसारखे सर्व ठरले आणि साखरपुडाही झाला.

माझ्यानंतर त्याने अजून दोन अभिनेत्रींसोबत साखरपुडा केला. तो (अक्षय कुमार) त्यावेळी माझ्यासोबत ब्रेकअप करत आणि दुसऱ्यांसोबत साखरपुडा करत आणि परत माझ्याकडे येत.

शिल्पा शेट्टी हिने देखील अक्षय कुमारवर काही वर्षांपूर्वी अशाचप्रकारचे आरोप हे केले होते. अक्षय कुमार आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक नक्कीच आहे.