Photos : वाघ सिस्टर्स अन् जंगलातला खरा वाघ; अल्फा फेम शर्वरीची बहिणीसोबत जंगल सफारी, फोटो पाहाच!
अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या तिच्या एका खास सफारीमुळे चर्चेत आहे. बहीण कस्तुरी वाघसोबत तिने जंगल सफारीचा आनंद लुटला. यावेळी दोघींना वाघाचं दर्शनही झालं. शर्वरीने शेअर केलेले हे खास फोटो आणि व्हिडीओ पाहिलेत का?

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्ससोबतच सोशल मीडियावरील पोस्टमुळेही बरीच चर्चात असते. नुकतीच शर्वरी आपल्या बहिणीसोबत जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी पोहोचली होती. या सफारीचे काही खास फोटो आणि व्हिडिओ तिने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री शर्वरी वाघ हिने आपली बहीण कस्तुरी वाघसोबत जंगल सफारी करतानाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शर्वरी आणि कस्तुरी यांनी या जंगलातील सुंदर वातावरणाचा आणि शांततेचा पुरेपूर आनंद घेतला. दोघींच्या या निवांत आणि सुंदर फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जंगल सफारीदरम्यान शर्वरी आणि तिच्या बहिणीला अतिशय नशीबवान क्षण अनुभवायला मिळाला. त्यांना प्रत्यक्ष जंगलात एका रुबाबदार वाघाचे दर्शन झाले. शर्वरीने हा अत्यंत रोमांचक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करून चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
जंगलातील वन्यजीव आणि तिथल्या अप्रतिम निसर्गसौंदर्याचे काही विलोभनीय क्षण शर्वरीने या ट्रिपदरम्यान टिपले आहेत. कधी घनदाट झाडी, कधी वन्यप्राणी तर कधी मोकळे वातावरण, या सगळ्याचा अनुभव घेत शर्वरीची ही सफारी अत्यंत संस्मरणीय ठरली.
या जंगल सफारीमध्ये शर्वरीची बहीण कस्तुरी वाघदेखील तिच्यासोबत सहभागी झाली होती. सोशल मीडियावर शर्वरीच्या या पोस्टमुळे तिची बहीण कस्तुरी हिचीही बरीच चर्चा रंगली असून, दोघींच्या बॉन्डिंगचे कौतुक केले जात आहे.
आपल्या या जंगल सफारीच्या पोस्टला शर्वरीने अगदी हटके कॅप्शन दिले आहे. तिने 'Wagh in the nature' असे मजेशीर कॅप्शन लिहून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे, ज्यावर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. (सर्व फोटो साभार- शर्वरी वाघ- इन्स्टाग्राम)