
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. लग्न झाल्यापासून सतत सोनाक्षी सिन्हा चर्चेत आहे.

सोनाक्षी सिन्हा ही नुकताच स्पॉट झाली. यावेळी फोटोसाठी खास पोझ देताना सोनाक्षी दिसली. विशेष म्हणजे पापाराझी यांच्यासोबत मस्ती करतानाही सोनाक्षी दिसली.

सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत पापाराझीला फोटो काढायचा होता. यावेळी ते एकमेकांना जा बोलतात. तुमच्यासोबत फोटो काढला की, लग्न जमते असे त्यांनी म्हटले.

यावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, माझ्यासोबत फोटो काढल्याने लग्न जमते? पापाराझी म्हणाले की, म्हणजे तुमच्यासोबतचा फोटो पाहून लग्न होते.

सोनाक्षी सिन्हा ही नेहमीच पापाराझींना बोलताना दिसते. सोनाक्षी सिन्हाने सात वर्ष झहीर इक्बाल याचा डेट केले आणि मग लग्नाचा निर्णय घेतला.