
गेल्या काही दिवसांपासून तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे… वीर पहारिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर आणि तारा यांनी त्यांच्या नात्याची कबुली सर्वासमोर दिली आहे.

एवढंच नाही तर, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत वीर आणि तारा यांनी त्यांच्या रोमँटिक डेटबद्दल सांगितलं आहे. तारा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. पण आता तारा तिच्या ग्लॅमरमुळे चर्चेत आली आहे.

तारा हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये तारा हिने सूट घातला आहे. ब्राऊन रंगाच्या सूटमध्ये ताराचा बॉसी लूक अनेकांना आवडला आहे. तारा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

तारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ सिनेमातून तारा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये तारा झळकली. रिपोर्टनुसार, तारा हिच्याकडे 2 – 3 कोटींची संपत्ती आहे.

ताराकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. तारा हिच्याकडे 43.61 लाख रुपयांची ऑडी क्यू3 आणि 1.16 कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ जीएलएस आहे. सोशल मीडियावर देखील तारा कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अभिनेत्री मोठी कमाई करते.