
अभिनेत्री उर्वशी रौतेला हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्वशी रौतेलाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. उर्वशी रौतेला सोशल मीडियावरही सक्रिय असते.

आता नुकताच उर्वशी रौतेला हिचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. उर्वशी रौतेलाचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले.

उर्वशी रौतेला हिने चक्क 24 कॅरेट सोन्याचा ड्रेस घातला. ड्रेससोबतच अभिनेत्रीने अनेक दागिने देखील सोन्याचे घातले. आता याचेच फोटो व्हायरल होत आहेत.

हा सोन्याचा ड्रेस घालून उर्वशी रौतेला हिने रॅंप वॉक देखील केला. काही दिवसांपूर्वीच उर्वशी रौतेला हिने चक्क सोन्याचा केस तिच्या वाढदिवसाला कट केला.

उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही उर्वशी रौतेला ही दिसते.