
जॉनी लिवर यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यांनी चाहत्यांची मन जिंकली. मागच्या 40 वर्षांपासून ते बॉलिवूडमध्ये आहेत. आज त्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत. आरामदायक आलिशान आयुष्य जगत आहेत.

या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना केला. आता कॉमेडीयन सपन वर्माच्या यूट्यूब चॅनलवरी जॉनी लिवर यांनी खुलासा केल की, एकवेळ त्यांना दारुच व्यसन लागलेलं. जुन्या दिवसांची आठवण सांगताना जॉनी लिवर म्हणाले की, अचानक मिळालेल्या यशाचा त्यांच्या लाइफस्टाइल आणि आरोग्यावर वाईट परिणाम झालेला.

जॉनी लिवर म्हणाले की, माझं शेड्यूल खूप बिझी असायचं. अनेकदा थकवा जाणवायचा. दिवसाच चित्रपटाच शूटिंग आणि रात्री शो मध्ये परफॉर्मन्स करायचो. त्यावेळी भरपूर दारु प्यायला लागलेलो. जॉनी लिवर यांनी सांगितलं की, चौपाटीवर ते सकाळी 4-4 वाजेपर्यंत दारु प्यायचे. त्यावेळी पोलीस त्यांना ओळखून त्यांच्या गाडीत बसवायचे. जेणेकरुन ते सुरक्षित रहावेत.

जुन्या दिवसांबद्दल बोलताना जॉनी लिवर म्हणाले की, मी लोकांना विनंती करेन की, प्लीज लिमिटमध्ये प्या. मी सर्व मर्यादा ओलांडलेल्या. एक दारुडा बनलेलो. मी चौपाटीवर बसून सकाळी 4-4 वाजेपर्यंत दारु प्यायचो. अनेकदा पोलीस यायचे. जेव्हा ते मला ओळखायचे, तेव्हा हसून बोलायच, अरे जॉनी भाई.

यशाचा तुमच्या डोक्यावर परिणाम होतो. एकवेळ माझ्याशिवाय एकही चित्रपट नाही बनायचा. मी इंटरनॅशनल शो ज करायचो. सतत ट्रॅव्हल करायचो असं जॉनी लिवर म्हणाले. या सगळ्यामध्ये मी स्वत:ला हरवलं. मग मी दारु सोडण्याचा निर्णय घेतला. आता मागच्या 24 वर्षांपासून मी दारु प्यालेलो नाही असा खुलासा जॉनी लिवर यांनी केला.