
मागच्या अडीच दशकात बॉलिवूड विश्वात अमीषा पटेल एक चर्चित चेहरा आहे. तिने 25 वर्षांपूर्वी ऋतिक रोशनसोबत रोमँटिक चित्रपटाने आपल्या करिअरची सुरुवात केलेली. हा चित्रपट सुपरडूपर हिट ठरलेला. तिचा अभिनय लोकांना खूप आवडलेला.

त्यानंतर सनी देओलचा चित्रपट गदर 2 मधून तिने पुनरागमन केलं. त्यानंतर अभिनेत्री अन्य काही प्रोजेक्टसमध्येही दिसली. खास बाब म्हणजे ती वयाच्या पन्नाशीतही आपला फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखली जाते. अजूनही ती काही चित्रपटात मुख्य भूमिका साकारते.

अमीषाने एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितलं की, तिला लग्नासाठी स्थळ आलेलं. पण तिच्यासमोर अट ठेवण्यात आलेली, अभियन सोडावा लागेल. पण अमीषाने नकार दिला. लग्नासाठी मी करिअरशी तडजोड करणार नाही अशी अमीषाची भूमिका आहे.

अमीषा पटेल खऱ्या आयुष्यात आता 50 वर्षांची झालीय. ती सिंगल आहे. असं नाहीय की, तिच्या आयुष्यात कधी लग्नाची संधी आली नव्हती. एकवेळ तिचं लग्न होणार होतं. पण लग्न होता,होता राहून गेलं.एका चर्चेमध्ये अमीषाने हा खुलासा केला.

अमीषा पटेल अशी तर सिंगल आहे. पण तिच्या रिलेशनशिप्सच्या अफवा उडत असतात. बिझनेसमॅन निर्वाण सोबत तिच्या अफेअरची चर्चा आहे. पण अभिनेत्रीने अधिकृतरित्या कन्फर्म केलेलं नाही. दोघांचा सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो व्हायरल झालाय. त्यावरुन अंदाज लावला जातो.