Dharmendra Death : शोलेचा वीरू हरपला! तरुणपणीचे Unseen Photos समोर, डोळ्यात येईल पाणी

हिंदी चित्रपटसृष्टीचे ही-मॅन, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ६० वर्षांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. 'शोले'सह २५० हून अधिक चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.

Updated on: Nov 24, 2025 | 2:20 PM
1 / 10
हिंदी चित्रपटसृष्टीतील ही-मॅन आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

2 / 10
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, त्यांच्या चाहत्यांवर आणि कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

3 / 10
धर्मेंद्र यांनी त्यांच्या साहसी भूमिका, रोमँटिक अंदाज आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे ६० वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या चित्रपटांमधील लोकप्रियतेसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास दुर्मिळ क्षणाचे फोटोही समोर आले आहेत.

4 / 10
धर्मेंद्र यांच्या तरुणपणीचा दुर्मिळ फोटो समोर आला आहे. हा फोटो ब्लँक अँड व्हाईट स्वरुपाचा आहे. या फोटोत त्यांचा साधेपणा आणि निरागसता पाहायला मिळत आहे.

5 / 10
यासोबतच एका फोटोत ते अभिनेते मनोज कुमार ट्रॉफी स्वीकारताना दिसत आहेत. या फोटोत दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळत आहे.

6 / 10
धर्मेंद्र यांचा अंदाज अतिशय स्टायलिश आणि देखणा होता. ते कायमच छान रेट्रो लूकमध्ये असायचे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात देखणे, दमदार आणि लोकप्रिय अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जायचे.

7 / 10
'अ‍ॅक्शन किंग' आणि 'ही-मॅन' या टोपणनावाने ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी ६० हून अधिक वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे २५० हून अधिक चित्रपटांत काम केले. १९६० मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले.

8 / 10
१९६६ मध्ये आलेला 'फूल और पत्थर' हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटानंतर त्यांना कायम यश मिळत राहिले. त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

9 / 10
'शोले' मधील वीरू, 'सीता और गीता', 'प्रतिज्ञा', 'चुपके चुपके' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. ते रोमँटिक, कॉमेडी आणि ॲक्शन अशा प्रत्येक प्रकारच्या भूमिकांना न्याय दिला.

10 / 10
धर्मेंद्र यांना चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने २०१२ मध्ये 'पद्म भूषण' या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले होते. धर्मेंद्र यांचे निधन ही बॉलिवूडसाठी एक मोठी हानी आहे.