
एक काळ असा होता जेव्हा गोविंदा नीलमच्या प्रेमात वेडा होता. गोविंदाने तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याची साखरपुडाही मोडला पण नंतर दोघांनी लग्न केले नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

गोविंदा याचं नाव अभिनेत्री दिव्या भारती हिच्यासोबत जोडण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या अफेअरची बातमी एका मासिकातही प्रसिद्ध झाली होती. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. पण अभिनेत्रीच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली.

2000 मध्ये शूटिंग दरम्यान राणी मुखर्जी आणि गोविंदा एकमेकांच्या संपर्कात . पण हे प्रेम जास्त काळ टिकलं नाही कारण सुपरस्टारची पत्नी सुनीता हिला याबद्दल कळल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय़ घेतला.

गोविंदा याचं अभिनेत्री रवीना टंडनसोबतच्या अफेअरचीही चर्चा होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

गोविंदाला माधुरी दीक्षित खूप आवडायची, तिच्यासोबत अफेअरच्या अफवा होत्या. पण ती फक्त अफवाच ठरली.