
1997 साली आलेल्या सीन देओलच्या ‘बॉर्डर’ सिनेमाचा हा सीक्वल आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रचंड हाइप आहे. मेकर्सनी सुद्धा हा चित्रपट मोठ्या प्रमाणात रिलीज करण्याची तयारी केली आहे. फिल्म क्रिटिक आणि ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श नुसार ‘बॉर्डर 2’ भारतात 4800 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे.

या स्क्रीन्सच्या माध्यमातून दरदिवशी भारतात सनी देओलच्या या चित्रपटाचे जवळपास 17 हजार शोज दाखवले जाणार आहेत. चित्रपट इतक्या मोठ्या प्रमाणात रिलीज होतोय याचा अर्थ रिलीज नंतरही चित्रपटाचा फायदा होईल. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

अनुराग सिंह यांच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या ‘बॉर्डर 2’ रनटाइम 199.07 मिनट (3 तास 19 मिनिट आणि 7 सेकंद) आहे. म्हणजे हा चित्रपट पहिल्या पार्टपेक्षा पण जास्त लांब आहे.

पहिल्या ‘बॉर्डर’ सिनेमाची लांब 2 तास 56 मिनिटांची होती. सनी देओल, अहान शेट्टी, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझसह या चित्रपटात सोनम बाजवा, मेधा राणा, मोना सिंह आणि अन्या सिंह महत्वाच्या रोलमध्ये आहेत.

एकाबाजूला चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनुराग सिंह यांनी संभाळली आहे. तर दुसरीकडे पहिल्या ‘बॉर्डर’चे डायरेक्टर जेपी दत्ता ब त्यांची मुलगी निधि दत्ता, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी मिळून चित्रपट प्रोड्यूस केला आहे.