
बोरिवलीमध्ये डेटिंग अॅप्सवर बनावट प्रोफाइल तयार करून तसेच हॉटेलमध्ये आमंत्रित करून तरुणांना फसवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

ही टोळी डेटिंग अॅप्सवर महिलांचे बनावट प्रोफाइल तयार करायची. तसेच महागडी पेये आणि जास्त बिलांचे आमिष दाखवून तरुणांना फसवसे जायचे. तरुणांची फसवणूक करणारी ही आंतरराज्य टोळी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एकूण 22 जणांना अटक करण्यात आली आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

बोरीवलमध्ये एका तरुणाने तक्रार केली होती. तक्रारदार तरुणाची ओळख टिंडर अॅपद्वारे झाली होती. त्यानंतर या तरुणाला बोरिवलीतील टाइम्स स्क्वेअर हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. मद्य प्राशन करण्याच्या बहाण्याने त्याच्याकडून क्यूआर कोडद्वारे 14,700 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेण्यात आले. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे, एमएचबी पोलिसांनी नवी मुंबईतील एका हॉटेलवर छापा टाकला आणि दिल्ली, गाझियाबाद आणि उत्तर प्रदेशातून 15 पुरुष आणि 6 महिलांना अटक केली. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

मिळालेल्या माहितीनुसार ही टोळी Tinder, Bumble, OkCupid, MeetMe इत्यादी ऑनलाईन सेवा वापरत असे. या अॅप्स, वेबसाईट्सच्या माध्यमातून ही टोळी तरुणांना फसवायची. पोलिसांनी या कारवाीत 3.74 लाख रुपये किमतीचे 27 मोबाईल फोन, एक पोर्टेबल प्रिंटर, एक स्वाइप मशीन जप्त केली आहे. आरोपींनी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात शेकडो लोकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)