
ब्रेन हॅमरेजमुळे 9 वर्षीय रिया मिस्त्रीचा 2024 मध्ये मृत्यू झाला. पण मृत्यूपूर्वी तिचा हात 16 वर्षीय अन्मता अहमद या मुलीला देण्यात आला होता. बहीण गमावलेल्या रियाचा भाऊ शिवम मिस्त्रीला राखी बांधण्यासाठी अन्मता अहमद थेट वलसाडला गेली आणि तिने रक्षाबंधन साजरी केल.

2016 पासून हात गमावलेल्या अन्मताला गेल्यावर्षी हात डोनेट करण्यात आला होता. बहीण गमावलेल्या शिवमचा हात राखीशिवाय राहू नये, म्हणून अन्मताने वलसाडला जाऊन रक्षाबंधन साजरे केले.

अन्मता अहमदचा 2016 साली उत्तरप्रदेशमधल्या तिच्या घरच्या टेरेसवर खेळताना विजेच्या वायरला हात लागून हात निकामी झाला होता.

गेल्यावर्षी रिया मिस्त्रीच ब्रेज हॅमरेज झाल्यानंतर तिच्या मृत्यूपूर्वी लोअर परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कुटुंबियांच्या समतीने अन्मताला अहमदला हा हात दान करून यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली होती.

शिवमला यंदाच रक्षाबंधन त्याच्याच बहिणीच्या हाताने राखी बांधून अन्मताने त्याची बहीण अजुनही त्याच्यासोबत असल्याचा विश्वास दिलाय.